-प्रदिप रासकर
निमगाव भोगी : शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांची बदली झाल्याने शिरुरच्या पोलीस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती झाली आहे. गुंजवटे यांच्या कार्यकाळात शिरुर शहरासह पोलीस स्टेशन हद्दीत सोनसाखळी चोरी, शेतकऱ्यांचे कृषीपंप, विद्युत रोहीत्र, केबल चोरी, दुचाकी आणि चारचाकी गाडयांची चोरी, अल्पवयीन मुली-महिला गायब होण्याचे प्रकार असे अनेक गुन्हे घडले असुन त्या गुन्ह्यांची अदयापही उकल झालेली नाही.
तसेच शिरुर शहरासह ग्रामीण भागात जुगार, मटका, गांजा विक्री, दारु विक्री, गुटखा, वेशा व्यवसाय या अवैध धंदयांनी उच्छाद मांडला असुन यांचा बिमोड करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पुढे आहे.
आता शहरासह तालुक्यात जुगार, मटका, गुटखा विक्री, अवैध दारु, गांजा विक्री तसेच गॅस रिफिलींग व्यवसाय जोमात सुरु असून त्यांना आवर घालण्यास प्रयत्न होणार का…? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिरुर शहरामध्ये वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असुन यालाही आवर घालणे महत्त्वाचे आहे. तसेच शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून शिरुरकरांना संदेश केंजळे यांच्याकडुन दबंग कामगिरीची अपेक्षा आहे.