अमोल दरेकर
Sanaswadi News : सणसवाडी : सणसवाडी येथील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाबळेवाडी शाळेत ‘कवी आपल्या भेटीला’ उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी गणेश आघाव यांनी बहारदार सादरीकरण केले.
कवी गणेश आघाव यांच्या कवितांचे सादरीकरण
कवी गणेश आघाव यांचे आजपर्यंत चार काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. महाराष्ट्र शासनाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार त्यांना मिळालेला असून जपानच्या पाठ्यपुस्तकात त्यांची ‘पोरी शाळेला निघाल्या’ ही कविता जपानी भाषेत अभ्यासाला आहे.
कार्यक्रमात आघाव यांनी ‘पोरी शाळेला निघाल्या’, ‘झाड झाले मोठे’, ‘चला शाळेत जाऊ’, ‘झाडे लावणारी मुले’ आणि ‘पावसाची गाणी’ आदी कवितांचे बहरदार सादरीकरण केले.(Sanaswadi News) सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन या कविता ऐकत होते. तब्बल दोन तास चाललेल्या या काव्य मैफिलीत विद्यार्थ्यांनीही कवितांच्या तालावर ठेका घेतला.
याप्रसंगी मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, लेखक कुंडलिक कदम, शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष व शिष्यवृत्ती तज्ञ विजय गोडसे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरक काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, विद्या सपकाळ, वैशाली जगताप, गितांजली वाघोले, (Sanaswadi News) अंगणवाडी सेविका सिता मिसाळ, अंगणवाडी मदतनीस भाग्यश्री जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, उपाध्यक्ष मल्हारी वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाशकाका वाबळे, माजी सरपंच केशव वाबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष अंकुश वाबळे, सतिश वाबळे, सुरेखा वाबळे, सतिश कोठावळे, प्रकाश विठ्ठल वाबळे, भगवान वाबळे, खंडू वाबळे, आणि दत्तात्रय बारगळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला अजित सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले. साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी सुत्रसंचालन केले. किरण अरगडे यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मंगलमुर्तींच्या किमती यंदा २५ ते ३० टक्क्यांनी वाढणार…!
Pune News : पुणेकरांसाठी गुड न्यूज! लोहगाव विमानतळावरून आता २४ तास वाहतूक…!