यवत: गुरुपौर्णिमेचे औचित्य साधुन दौंड येथील श्री सद्गुरु स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या मान्यवरांना समर्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वैभव कांबळे यांच्या पुढाकाराने दौंड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये समर्थ पुरस्कार सोहळा पार पडला. गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
डॉ. रोहन खवटे ( क्रीडा), डॉ.सुनिता कटारिया (सामाजिक), प्रसाद पांडव (पौराहित्य), रितेश ओझा (धार्मिक), ॲड.अक्षय शितोळे (विधी), उमेश जगदाळे (उद्योजक), रामदास मखरे (शैक्षणिक), श्रीनाथ ननवरे (राजकीय), डॉ.प्रसाद कोल्हे (वैद्यकीय) यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात मयुरेश पोळ या बालकाचे प्रवचन झाले. यावेळी श्री स्वामी समर्थ मंदिरास आकर्षक सजावट करण्यात आली होती.