Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज 66 वा अमृत बीज उत्सव भक्तिरसात साजरा

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 16 March 2025, 15:03

गोरख जाधव

 

डोर्लेवाडी, (पुणे) : आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा! असे म्हणत प्रती देहू समजल्या जाणाऱ्या डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे संत तुकाराम महाराजांचा 66 वा अमृत बीज उत्सव भक्तिरसात साजरा करण्यात आला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत “तुकाराम-तुकाराम” नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

डोर्लेवाडीच्या मंदिरात पहाटेच महाभिषेक आणि हरिनामस्मरणाने सोहळ्याची सुरुवात झाली. टाळ-मृदंगाच्या तालावर अखंड हरिपाठ सुरू झाला आणि गुलाल पुष्पवृष्टीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

जगाला शांती, विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी रविवार (ता. 16 ) ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला. डोर्लेवाडी परिसरात भाविकांची मांदियाळी जमली होती. तुकाराम-तुकारामचा नामघोषात अन् टाळमृदंगाच्या गजरात डोर्लेवाडीनगरी ही भक्तिरसात न्हाऊन निघाली.

आरती तुकारामा! स्वामी सद्गुरू धामा!!
सच्चिदानंद मूर्ती!पाय दाखवा आम्हा!!
यंदाचे बीज सोहळ्याचे 66 वे वर्षे आहे. या निमित्ताने यावेळी मंदिरात टाळ मृदंगाच्या तालात अखंड हरिनामाचा गजर सुरु झाला. अन पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा जयघोष होताच उपस्थित हजारो भाविकांनी जड अंतकरणाने श्रींच्या मूर्तीवर गुलाल पुष्प वर्षाव करून संत तुकाराम बीजेचा सोहळा साजरा केला. प्रती देहू समजल्या जाणाऱ्या येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात लाखो भाविकांनी ‘याची देही याची डोळा’ बीजेचा सोहळा अनुभवला.

देवस्थान समिती व सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने बीज उत्सव सोहळ्यानिमित्त आठ दिवसांपासून कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच मंदीरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी महाभिषेक झाल्यानंतर बाळासाहेब नाळे महाराज यांचे प्रवचन झाले. त्यानंतर महाराज लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे बीजे निमित्त फुलाचे कीर्तन झाले. कीर्तनात त्यांनी संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र व त्यांनी समाजासाठी केलेल्या अलौकिक कार्याचे वर्णन केले. दुपारी 12 वाजता अखंड हरिनामाचा गजर झाला. त्याच बरोबर अत्यंत जड अंतकरणाने भाविकांनी गुलाल पुष्प वर्षाव करून बीजेचा सोहळा साजरा केला.

पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातून लाखो भाविक दर्शनासाठी दरवर्षी येतात. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण मंदीर परिसरात भव्य मंडप टाकण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, तसेच शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली होती. बारामती शहर पोलीसांच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. सामाजिक संस्था व स्थानिक पदाधिकारी यांच्यावतीने मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांनी तुकाराम बीजेच्या निमित्तानं कार्यक्रमाला हजेरी लावली. जवळ जवळ सुप्रिया सुळे या एक तास कीर्तानामध्ये दंग झाल्या होत्या यावेळी कीर्तानाचा आनंद घेतला.

दरम्यान, येथील यात्रेला त्यांचे पै-पाहुणे, माहेरवासीनी दरवर्षी आवर्जून येतात. मंदिरात दर्शनासह यात्रेचा आनंद कुटुंबासह लुटतात. गावात अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लीम एकत्र नांदत असल्याने यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post

ट्रक मालकाच्या पोरीवर ड्रायव्हरचा जीव; प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.