लोणी काळभोर, (पुणे) : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सायली तेजस शिवरकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सायली शिवरकर यांचे पती तेजस शिवरकर यांनीही आळंदी म्हातोबाची गावाचे उपसरपंचपद भूषविले आहे. शिवरकर दाम्पत्य हे गावातील उपसरपंच पद भूषवणारी पहिली जोडी ठरली आहे.
मावळत्या उपसरपंच स्वाती जवळकर यांनी उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. या पदासाठी आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (ता. १९) पार पडली. निवडणूक प्रक्रिया आणि निर्णय अधिकारी तथा विद्यमान सरपंच सोनाली जवळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत सायली शिवरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच सोनाली जवळकर यांनी शिवरकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. या निवडणूक प्रक्रियेत ग्रामविकास अधिकारी वीरकर मॅडम यांनी शासकीय कामकाज पाहिले.
दरम्यान, सायली शिवरकर यांची उपसरपंचपदी निवड होताच, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून एकच जल्लोष केला. त्यानंतर सरपंच सोनाली जवळकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच सायली शिवरकर यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जेष्ठ नेते भगवान जवळकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप वाल्हेकर, माजी सरपंच आबासाहेब जवळकर, माजी उपसरपंच अशोक जवळकर, बापु जवळकर, विजय जवळकर, भाऊसाहेब कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य शंकर जवळकर, लक्ष्मण भोंडवे, प्रकाश शिवरकर, मोहन जवळकर, दादा जवळकर, माऊली शिवरकर, बाळासाहेब शिवरकर, गणेश जवळकर, दिनकर भोंडवे , वाल्मिक जवळकर, संतोष जवळकर, राहुल भोंडवे , संदिप पवार उपस्थित होते.
यावेळी पुणे प्राईम न्यूज शी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच सायली शिवरकर म्हणाल्या की, गावच्या सर्वागिण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण एकत्र येऊन प्रयत्न करणार आहे. तसेच गावातील विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन शिवरकर यांनी यावेळी केली आहे.