लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात हि ‘जय भवानी- जय शिवाजी’ ‘हर हर- महादेव’ च्या जयघोषाने करून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा परिधान केल्या होत्या. यावेळी शिक्षिका नीला सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पारंपारिक खेळ, लेझिम आदी खेळांचे प्रात्यक्षिक केले. शिवमिरवणुकीचे स्वागत व शिवप्रतिमेचे औक्षण रेनबो प्री स्कूलच्या प्राचार्या ऐश्वर्या काळभोर यांनी केले.
नितीन काळभोर यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या गुणविशेषांवर प्रकाश टाकून आपण त्यांचा आदर्श घेण्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राचार्या मिनल बंडगर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
दरम्यान, यावेळी रेनबो स्कूलच्या व्यवस्थापिका मंदाकिनी काळभोर यांनी महिला शिक्षिकांसह शिवजन्माचा पाळणा म्हणून छत्रपती शिवरायांच्या जन्माचे स्वागत केले. शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये अश्विन मनगुतक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तलवार बाजी, लाठीकाठी अशा अंगावर शहारा आणणाऱ्या शिवकालीन युद्धकलांचे आणि पावनखिंड चित्रपटातील “युगत मांडली” या शौर्यगीताचे सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. कला शिक्षक दिपक शितोळे यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने ५० किलो रांगोळी वापरून आपल्या अप्रतिम कलेने चित्रातुन साकारलेल्या ५५० चौरस फुट आकाराच्या भव्यदिव्य शिवप्रतिमेचे कौतुक करण्यात येत होते.
यावेळी प्रियंका सुभेदार, पायल बोळे, मनीषा सुपेकर, अंजली सगर, मयुरी सावंत, ऋतुजा देशमुख, शिरीन सय्यद, दीपाली साळुंखे, पूनम सिंग, सुप्रिया गावडे, प्रीती कदम, सीमा शेळके, सीमा पाटील, प्रियंका जाधव, प्रशांत लव्हारे, निखिल जाधव, विकास धुमाळ, शिवराज साने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्योती कुंभार यांनी केले.