Sag News : सहकारनगर : पुण्यात आलेल्या पालखी सोहळ्याच्या दर्शनाची ओढ प्रत्येकाला लागली आहे. सोहळ्याचे दर्शन घेता यावे यासाठी भक्त मोठ्या आनंदाने जात असतात. मात्र एका महिलेची दर्शन घेण्याची इच्छा अपुरीच राहिली. दर्शनासाठी जात असताना महिलांच्या रिक्षावर झाड पडले आणि पालखीच्या दर्शनाआधीच तिचा अंत झाला. ही घटना मुक्तांगण शाळेजवळ आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. (The desire to see the palanquin ceremony remained insufficient; A woman died after a tree fell on a rickshaw)
मुक्तांगण शाळेजवळ घडली दुर्घटना
लीलाबाई विश्वनाथ काकडे (वय ६३, रा. श्रीकृपा सृष्टी हौसिंग सोसायटी, दत्तनगर, जांभूळवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. (Sad News) तर नम्रता सचिन पोळ (वय ४६), कमल अडिकामे (वय ६९), मीना पुरुषोत्तम पोळ (वय ६१) असे जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. या रिक्षात आणखी एक तीन वर्षांचे बालकही होते. सुदैवाने ते सुखरूप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीलाबाई काकडे या पालखीच्या दर्शनासाठी एका रिक्षातून निघाल्या होत्या. त्यांच्यासमवेत रिक्षामध्ये आणखी तीन महिला व एक लहान मुलगाही होता. त्यांची रिक्षा दत्तनगर येथील मुक्तांगण शाळेजवळील बसस्थानकामागे तारेच्या कुंपणाजवळ येऊन इतर प्रवाशांसाठी थांबली होती. त्याचवेळी कुंपणातील एका भल्यामोठ्या झाडाची फांदी रिक्षावर पडली. (Sad News) त्यामुळे रिक्षातील तीनही महिला जखमी झाल्या. रिक्षाचे टप फाटून फांदी रिक्षात घुसल्याने जखमी महिलांना रिक्षाच्या बाहेर पडता येणे शक्य नव्हते. स्थानिक नागरिक मदतीला धावले व त्यांनी सर्व जखमींना रिक्षाच्या बाहेर काढले. काहींनी तातडीने अग्निशमन दलाला कळविल्यानंतर रेस्क्यू टीम तत्काळ दाखल झाली. त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र दरम्यान रस्त्यातच लीलाबाई काकडे यांचे निधन झाले.
अग्निशमन अधिकारी रवींद्र आढाव, प्रशांत गायकर व वाहनचालक सागर देवकुळे, अक्षय राऊत तसेच तांडेल, संदीप घडशी आणि फायरमन महेंद्र सकपाळ, शैलेश गोरे, चंद्रकांत आनंदास, भूषण सोनावणे, अक्षय शिंदे, हेमंत शिंदे, गणेश मोरे यांनी या रेस्क्यू कामगिरीत सहभाग घेतला. (Sad News) घटनेची नोंद पोलिसात झाली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद डोंगरे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चंदननगर येथील बीआरटी मार्गावर टँकर पलटी
Pune News : पुण्यात दहा रुपयाची नोट उचलणे पडले महागात; 15 हजारांचा मोबाईल चोरट्यांनी केला लंपास
Pune News : : कामगारांनीच मारला हॉटेलमध्ये डल्ला !; बनावट चावीने कुलूप उघडत रोकड व साहित्याची चोरी