लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष होले यांचे वडील मारुती बाबू होले (वय-८०) यांचे सोमवारी (ता. ३०) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर मूळ गावी खानवडी (ता. पुरंदर) येथे सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. पुणे शहर पोलीस दलातील हवालदार संतोष होले व पोलीस नाईक पोपट होले यांचे ते वडील होत.
दरम्यान, गरीब कुटुंबात जन्म झाला म्हणून कुणाचे आंतरिक गुण कमी होत नाहीत, याचा दाखला कायम मारुती होले इतर नागरिकांना देत असत. अशाच मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत गरिबीच्या खाणीतून त्यांच्या तिन्ही मुलांना शिकवून दोन मुलांना देशसेवेसाठी अर्पण केले.