सागर जगदाळे
भिगवण: भिगवण पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार सचिन अशोक पवार यांना पोलीस खात्यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक यांच्याकडून २०२३ चे ” पोलीस महासंचलक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक” प्रदान करण्यात आले.
भिगवण पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असलेले पोलीस अंमलदार सचिन अशोक पवार हे २००७ पासून पुणे ग्रामीण पोलीसमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. त्यानंतर त्यांनी २००९ ते २०१५ या कालावधीमध्ये नारायणगाव पोलीस स्टेशन, २०१५ ते २०२१ या कालावधीमध्ये लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावले. २०२१ पासुन ते भिगवण पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस आहेत.
पोलीस अंमलदार सचिन अशोक पवार यांनी पोलीस खात्यामध्ये १६ वर्षांच्या सेवेमध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, अवैध अमली प्रदार्थ करावाई, अवैध गुटखा वाहतुक कारवाई अशा विविध स्वरूपाच्या कारवाई करून उल्लेखनिय कामगिरी केली आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेवुन पोलीस महासंचालक यांनी पोलीस अंमलदार सचिन अशोक पवार यांना सन २०२३ चे ” पोलीस महासंचालक विशेष सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरव केला.