विजय लोखंडे
वाघोली, (पुणे) : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असून या दोन्ही तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे शिरूर-हवेलीत एकनिष्ठ, स्वाभिमानी पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. त्यांनी आता जागृत राहून गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याची टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली आहे.
तसेच शिरुरचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवाराचे काम करत आघाडीचा धर्म पाळून अमोल कोल्हे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे अवाहन देखील सचिन अहिर यांनी केले आहे.
वाघोली येथे शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी जिल्हा उपप्रमुख संजयराव सातव पाटील यांच्या अमृत पॅलेस बंगला परिसरात जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, आमदार अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व महिला भगिनी, पदाधिकारी यांची बैठक पार पडली.
या बैठकीला संजयराव सातव पाटील, पुणे जिल्हा सल्लागार राजेंद्र पायगुडे, युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सह सचिव विशाल सातव पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख युवराज दळवी, वाघोली शहरप्रमुख दत्तात्रय बेंडावले, महिला आघाडीच्या माजी तालुका संघटक सविता कांचन, पंचायत समितीचे माजी सदस्य काळुराम मेमाणे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश सातव, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा समन्व्यक अलका सोनवणे तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाचे शिरूर- हवेलीतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.