पुणे : सध्या मराठा आरक्षणावरून सत्ताधारी पक्षातही आरेपप्रत्यारोप होतायतं. काल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले होते. त्यांच्या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून प्रत्युत्तर दिलं आहे.‘मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून संजय गायकवाडांना हाकलून द्यावं’अशी जहरी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यावर छगन भुजबळ यांनी आक्षेप नोंदवला. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. “छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत असतील, मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा”, अशी खोचक टीका संजय गायकवाड यांनी केली. त्यांच्या या टीकेला अगदी तशाच शब्दांत उत्तर रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून देण्यात आलं आहे.
त्यांच्या टीकेला रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं, “संजय गायकवाड यांना अशी वक्तव्य करायला रोखल पाहिजे. अन्यथा त्यांचे पाय उखडून टाकायला कार्यकर्ते खंबीर आहेत. तू आमदार तुझ्या घरी, बोलताना नीट बोललं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे. अन्यथा सत्तेतील कुस्ती लोकांना पाहायला मिळेल”,असा इशारा रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला.