पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे विभागाकडून पुणे-दानापूर विशेष दैनंदिन रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे-दानापूर (ट्रेन क्र.०१४८१) स्पेशल येत्या २३ डिसेंबरपर्यंत ३० फेऱ्या होतील. ही ट्रेन पुण्याहून सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजता दानापूरला पोहोचेल. दानापूर-पुणे (ट्रेन क्र. ०१४८२) स्पेशल २५ डिसेंबरपर्यंत ३० फेऱ्या होणार आहेत.
दानापूरहून सकाळी साडेसहा वाजता गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी पुण्याला पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबे आहेत. या अतिरिक्त गाडीमुळे प्रवाशांना फायदा होणार आहे.