धायरी: पुण्यातील धायरी भागातील एका दागिन्यांच्या दुकानात दिवसाढवळ्या झालेल्या दरोड्यामागील सूत्रधार दुकानाचा मालक विष्णू दहिवाल असल्याचे उघड झाले आहे. १५ एप्रिल रोजी टाकलेला दरोडा दहिवालचे नातेवाईक दिलीप मंडलिक आणि राजेश गाल्फाडे आणि शाम शिंदे यांनी टाकला होता. सुरुवातीला गुन्हेगारांचा शोध सुरू करण्यात आला परंतु चौकशी दरम्यान पुणे पोलिसांना आढळून आले की, दहिवालने विम्याचे पैसे मिळविण्यासाठी दरोडा टाकला होता. शेअर बाजार आणि सोन्याच्या व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे दहिवाल आर्थिक अडचणीत होता आणि तो कर्जात बुडाला होता. त्याने मंडलिकसोबत दरोड्याची योजना आखली होती, दहिवाल यांनी मंडलिकला या कामासाठी २ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांनी चोरीचे दागिने जप्त केले आहेत.
पिस्तुलाचा धाक दाखवून २२ तोळे सोने लुटून नेल्याचा प्रकार 15 एप्रिल रोजी घडला होता. दरम्यान, दरोड्यांनी चोरी केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपन पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक छबू बेरडसह पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासाचे नेतृत्व केले. पोलिसांनी दुकानापासून ते दिघीपर्यंत अनेक सीसीटीव्हीची पाहणी करुन आरोपींचा माग काढला, पोलिसांनी या प्रकरणी राजेश गालफाडे व शाम शिंदे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता का संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.
सोन्याचे व्यवसायात मोठा तोटा झाला असून मी कर्जबाजारी आहे. माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. माझ्या दुकानात तुझ्या साथीदारासह चोरी करा. डिस्पलेमध्ये नकली दागिने आहेत. ते नकली दागिने तुझ्या साथीदारासह मला व कामगाराला धमकी देऊन मारहाण करुन घेऊन जा, असे दहिवाल यांनी त्यांच्या साथीदारांना सांगितले होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दहिवालने बनावट पिस्तूल वापरून दरोड्याची योजना अतिशय काळजीपूर्वक आखली होती. त्याने मंडलिक आणि इतर आरोपींना फक्त बनावट दागिने चोरण्यास सांगितले होते.