Ring Road लोणी काळभोर : पुणे शहर व परिसराच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणारा असा रिंगरोड Ring Road प्रकल्प आहे. सध्या रिंगरोडच्या संदर्भात पीएमआरडीए मध्ये अंतर्गत हालचालींना पुन्हा वेग आला असून सध्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प अहवाल तयार झाला की, रिंगरोडचे काम प्रत्यक्षात सुरु होणार आहे
पीएमआरडीए चे मुख्य अभियंता अशोक भालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार….!
या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मे महिन्यात सादर होणार आहे. अहवाल तयार झाल्यानंतर आवश्यक तेवढे भूसंपादन केले जाणार आहे. आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला मे महिन्यानंतर सुरुवात होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. या प्रकल्पाचे काम जसजसा निधी उपलब्ध होईल तसतसे केले जाणार आहे. रिंगरोडचे प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर पहिल्या अडीच वर्षात सोळु ते वडगाव शिंदे या अंतरामधील काम केले जाणार आहे.
दरम्यान, पुणे शहरात सोलापूर, अहमदनगर, नाशिक, सातारा, मुंबई या मोठ्या शहरांच्या बाजूकडून भरपूर अवजड वाहने येत असतात. पुणे शहरातून या पाचही शहरांना जोडणाऱे रस्ते हे बहूपदरी झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरून पुणे शहरात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. या अवजड वाहनांमुळे गरज नसताना शहरात वाहतूकीची कोंडी होते. शहराच्या चारही बाजूने रिंगरोड झाला तर हि अवजड वाहने शहरात येणार नाहीत त्यामुळे निम्मी वाहतूक कोंडी दूर होईल.