पुणे : राज्याचे लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा आज फैसला होणार असून यातून कोण बाजी मारणार ? गावाचा कारभार कुणाच्या हाती असणार ? भाजप – शिंदे वर्चस्व राखणार की मतदार महाविकास आघाडीला कौल देणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
राज्यातील एकूण ७६८२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १८) मतदान झाले होते. राज्यात सत्ता बदलानंतर होणारी पहिलीच निवडणूक म्हणून या ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहण्यात येत असून यानिकालांवर राजकीय पक्षांचे आगामी महानगरपालिका निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या निवडणुकीतच गावाचा रहाटगाडा कोण हाकणार हे पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे.
मागील पंचवार्षिक प्रमाणे यावर्षी देखील थेट गावातूनच सरपंच निवडण्यात येणार असल्याने त्यामुळे प्रत्येकानेच ‘सरपंचपद’ आपल्यालाच मिळावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. यामुळे देखील ही निवडणुकीत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामांचायतींचे आज निकाल जाहीर होणार असून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यातील ४५ ग्रामपंचायत सरपंच तर २७ ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे केवळ १७६ सरपंचपदासाठी ५१९ तर १०६२ सदस्यपदासाठी ३०१३ उमेदवार रिंगणार असणार आहेत.