शिरूर : भारतीय जनता पार्टीचे शिरूर शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्यानंतर शिरूर येथील भाजपच्या महीला मोर्चा आघाडीच्या अध्यक्ष प्रिया बिराजदार आणि सरचिटणिस शुभांगी पाचर्णे यांच्या सहीत १६ महीला पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले आहेत.
तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्याकडे आज ०५ जुलै रोजी निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात पक्षाच्या बैठकीमध्ये राजीनामे सुपुर्द केले आहेत. त्यामुळे शिरुरमध्ये भाजपचा बालेकिल्ला ढासळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
यावेळी बोलताना महीला आघाडी सरचिटणिस शुभांगी पाचर्णे म्हणाले कि,مपक्ष पदाधिकाऱ्यांना कोणतेही सहकार्य करत नसून वरीष्ठ पदाधिकारी आमचा फोन उचलत नाहीत. शासकीय अधिकाऱ्यांशी जनतेच्या कामांसंदर्भात कसलाही संपर्क करत नाही. त्यामुळे शिरूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.
पुढे बोलताना म्हणाल्या, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शहर पदाधिकाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. शिरुर तालुक्यातील मताधिक्यापेक्षा शिरूर शहरातील मताधिक्य महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांना त्या तुलनेत फार कमी झाले आहे. यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मोलाचे कष्ट घेतले होते, असंही पाचर्णे यावेळी म्हणाल्या.