-बापू मुळीक
सासवड : साई छत्र सोसायटी शेजारी सोनोरी रोड सासवड हद्दीमध्ये सासवड नगरपालिकेकडून नागरिकांना लागणाऱ्या सोयी सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे. याचाच प्रत्यय म्हणून साई छत्र सोसायटी शेजारी ड्रेनेजचे चेंबर किती दिवस झाले फुटले आहे. त्याबाबत नगरपालिकेत तक्रारी देऊन सुद्धा नागरिकांना आरोग्य, पाणी अशा विविध समस्या सोडविल्या जात नाही. हे ड्रेनेज फुटल्यामुळे शाळेत येण्या जाण्यासाठी, कामावर जाताना, रस्ता नुसता चिखलमय होऊन पूर्णपणे रहदारी ही विस्कळीत झाली आहे.
पावसामुळे या भागात अनेक ठिकाणी दुर्गंधी पाणी साचत असलायमुळे लहान मोठ्या व्यक्तींना डेंग्यूची लागण होण्याची शक्यता दिसून येत आहे. तरी सासवड नगरपालिका ड्रेनेज चेंबर नादुरुस्त व रस्ता याची कधी सोय करणार ?हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न भेडसावत आहे. या समस्या माजी नगरसेवकापर्यंत सुद्धा नागरिकांनी पोहोचवल्या. तरी सासवड नगरपालिका ही प्रशासकीय असताना सुद्धा सर्वसामान्यांच्या आरोग्य, पाणी या गोष्टींकडे कधी लक्ष घालणार? हा प्रश्न सर्वसामान्यांना आहेच. यासाठी नागरिकांनी सासवड नगरपालिकेला 9 ते10 महिन्यात निवेदन दिलेले आहे.
यावेळी शुभांगी सोनवणे, किरण शिरसाट, शीतल नाझिरकर, संगीता कासवेद, कोमल सपकाळ, रेशमा बनकर, राहुल बडदे, नंदा दीक्षित, राकेश शिंदे, प्रियंका मेमाणे अशा 20 ते 25 सर्वसामान्य नागरिकांनी आत्तापर्यंत तक्रारीचा पाढा वाचून सुद्धा तक्रारीचे निवारण केले जात नाही, अशी माहिती रेश्मा खेंगरे व शुभांगी सोनवणे यांनी प्रतिनिधीला माहिती दिली .