पुणे : कात्रज परिसरातील एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर केलेली मैत्री चांगलीच भोवली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एकावर पॉक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शफाक सय्यद (वय 19, रा मांगडेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी ही अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दहावीचे ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे पिडीत मुलीच्या आईने तिला मोबाईल फोन घेऊन दिला होता. इंस्टाग्राम या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुलीची आरोपीशी ओळख झाली होती. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पिडीत मुलगी दबावाखाली रहात असल्याचे तिच्या आईला दिसून आले.
तेव्हा तिला विश्वासात घेवुन विचारणा केली असता तिने सांगितले की, मी घरी एकटीच असताना अशफाक आला. “तु मला खुप आवडते मी तुझ्यावर प्रेम करतो आपण दोघे लग्न करूया” असे म्हणाला. तेव्हा मी त्यास नकार दिला. त्यानंतर अशफाकने जबदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. सदर प्रकार हा जानेवारी ते १२ फेब्रुवारी या दरम्यान वारंवार घडला आहे.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी अशफाक सय्यद यांच्यावर पॉक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी करीत आहेत.