Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरमालकाने मोटारसायकलची रेस केल्याचा राग मनात धरून भाडेकरूने केला खून ; लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 November 2023, 13:32
Youth died in koyta attack in wagholi pune

लोणी काळभोर: दारु पिल्यानंतर मोटारसायकलची रेस केल्याचा राग मनात धरून भाडेकरूने घरमालकाला मारहाण करीत पाण्याच्या टाकीत बुडवून खून केल्याची धक्कादायक घटना ऊरूळी देवाची (ता. हवेली) खंडोबा माळ परिसरात रविवारी दुपारी बारा ते दीड सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दादा ज्ञानदेव घुले (वय ५०, रा. खंडोबा माळ, उरुळी देवाची) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संतोष राजेंद्र धोत्रे (वय ३७, रा. खंडोबा माळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयत दादा घुले यांचा पुतण्या प्रथमेश संतोष घुले, (वय १९, रा. सर्व्हे नं ९६ घुले वस्ती, मांजरी रोड, जय मल्हार कॉलनी, दत्त मंदिरा समोर, मांजरी बुद्रुक, हडपसर, ता.हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा घुले हे फिर्यादी प्रथमेश यांचे चुलते होते. ते उरुळी देवाची येथील खंडोबाचा माळ या ठिकाणी राहत होते. दादा घुले यांचे लग्न झालेले आहे. मात्र त्यांची पत्नी त्यांच्या सोबत राहत नाही. त्यामुळे ते आपल्या आई वडीलांसमवेत राहतात. त्यांना दारु पिण्याचे व्यसन होते. तर आरोपी धोत्रे हा भाडेकरू म्हणून कुटुंबासोबत त्यांच्या चाळीत राहतो.

दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४१ वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी प्रथमेश याला फोन करून दादा हे दुपारी १.३० वाजल्यापासुन घरी आलेला नाही. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तो दारू पिऊन मोटारसायकलची जास्त रेस करत होते. त्यामुळे भाडेकरु संतोष धोत्रे व त्यांचे भांडण झाले असुन त्याने दादास मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. आजोबांनी त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते दोघेजण आजोबांचे ऐकत नसल्याने आजोबा घरापासुन बाहेर रस्त्याकडे निघुन गेले होते. त्यानंतर साधारण दीड तासाने आजोबा परत घरी आले तर दादा घरी नव्हता. त्यामुळे आम्ही त्याचा शोध घेत आहोत, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

 

त्यानंतर रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास प्रथमेश आपला मित्र प्रतिक भोसले यास घेऊन आजी व आजोबा राहत असलेल्या ठिकाणी गेला. त्यावेळी घरात पाहणी केली असता त्याला दादाची चप्पल व मोबाईल घरातील पार्किंगच्या जमिनीखालील पाण्याच्या टाकीजवळ दिसली. म्हणुन त्याने टाकीमध्ये डोकाऊन पहिले असता त्याला चुलत्यांचे शरीर पाण्यावर तरंगत असताना दिसले. त्यानंतर त्यांनी लागलीच जवळपासचे लोक बोलावून चुलत्यांना पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले. त्यावेळी ते मयत झाले होते.

दरम्यान, दादा यांच्या शरीरावर, पाठीवर, हाताच्या कोपऱ्यावर, डोक्याच्या पाठीमागील बाजुस जखमा झालेल्या दिसत होत्या. सदर बाबतची माहिती तात्काळ लोणी काळभोर पोलीसांना देण्यात आली. पोलीस आल्यानंतर मृतदेह तपासणीसाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे नेण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाला असल्याचे सांगितले. या प्रकरणी प्रथमेश संतोष घुले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला संतोष धोत्रे याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25
Next Post
Physical test for PCMC fireman recruitment to hold in january

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळल्या २३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp