पुणे : विमानतळावर कोणत्याही वास्तुला जास्त पैसे मोजावे लागतात, अनेक लोकांना ते शक्य होत नाही. मात्र आता पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरती याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून पुणे विमानतळ नव्या टर्मिनलवर चहा आणि पाणी स्वस्तात मिळणार आहे. लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर चहा सुमारे 100 रुपयांना तर पाण्याची बाटली 60 ते 80 रुपयांना विकत घ्यावी लागते. त्यामुळे पुणे विमानतळ नव्या टर्मिनलवरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मनाली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विमान टर्मिनलवर चहा, कॉफीचे दर हे सामान्य नागरिकांना परवडत नाहीत. त्यामुळे काही प्रवाशांकडून कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली होती. ती आता पूर्ण होत आहे. त्यानुसार आता चहा, पाणी 20 रुपयांमध्ये असणारा एक छोटा स्टॉल सुरू करणार आहे. त्यामुळे आता सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी ‘उडान’ योजना सुरू केली आहे. या स्टॉलवर कमी दरात चहा आणि पाणी उपलब्ध होणार आहे .
पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर प्रवाशांना चहा 100 रुपयांना तर पाण्याची बाटली 60 ते 80 रुपयांना विकत घ्यावी लागते. विमान टर्मिनलवर चहा, कॉफीचे दर सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडत नाहीत. यामुळे सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी ‘उडान’ योजना सुरू केली असून या योजनेच्या अंतर्गत काही प्रवाशांना कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध होणार आहे. उडाणच्या अंतर्गत आता चहा, पाणी 20 रुपयांत विमानतळ प्रशासन नवीन टर्मिनलवर एक छोटा स्टॉल सुरू करणार आहे. या स्टॉलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.