पुणे : तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तिला लिव्ह इन रिलेशन मध्ये राहण्यास सांगितले. मात्र, लिव्ह इनमध्ये राहण्यास तरुणीने नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने पीडित तरुणीच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर तिचा हात पकडून गैरवर्तन करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा येथे उघडकीला आला आहे. जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनेकदा हा प्रकार घडला आहे.
याबाबत येरवडा येथील २३ वर्षीय तरुणीने बुधवारी (ता. २८) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून प्रशांत भिंगारदिवे (वय-२५, रा. सावता नगर पंपिंग स्टेशन, भिंगार, जि. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या घरासमोरील सार्वजनिक रोडवरुन जात असताना आरोपी प्रशांत याने पीडित मुलीचा वारंवार पाठलाग केला. तिला फोन करुन पाठलाग करुन तिला लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याची मागणी केली. मात्र, तरुणीने ठामपणे नकार दिल्याने रुणाने भररस्त्यात तिचा हात पकडून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. तसेच तिच्यासोबत शारीरिक जवळीक साधण्यासाठी पाठलाग सुरू ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.