पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, धुळे जिल्हा परिषदेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
धुळे जिल्हा परिषदेत डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला धुळे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 4 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर.
– एकूण रिक्त पदे : 04 पदे.
– नोकरी ठिकाण : धुळे.
– शैक्षणिक पात्रता : 12वी पास + MS-Cit
– वेतन / मानधन : दरमहा रु. 20,650/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 09 मार्च 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धुळे.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://zpdhule.maharashtra.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.