PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेने (PMC) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-3 च्या 100 हून अधिक पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट pmc.gov.in वर जाऊन या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ फेब्रुवारी २०२४ (रात्री ११.५९) पर्यंत आहे. पुणे महानगरपालिकेच्या वर्ग – 3 संवर्गातील एकूण 113 JE सिव्हिल पदे थेट भरतीद्वारे भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
पात्रता निकष
- वयोमर्यादा: 5 फेब्रुवारी 2024 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत लागू आहे.
- शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डातून स्थापत्य अभियांत्रिकीमधील पूर्णवेळ पदवी/पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना वाचू शकतात.
अर्ज फी
- सर्वसाधारण/अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 1000 आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी रु. 900 आहे. माजी सैनिक/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
असा करा अर्ज?
- अधिकृत वेबसाइट pmc.gov.in ला भेट द्या.
- होम पेजवर ‘रिक्रूटमेंट’ वर क्लिक करा.
- आता ‘Recruitment 2024’ वर क्लिक करा.
- फॉर्म भरण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी करा.
- अर्ज भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.