पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता जेवणात गुंगीचे औषध देऊन महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना ३ ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आरोपीच्या भोसरी येथील घरी घडली आहे. या प्रकरणी ४५ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. २५ ऑक्टोबर) रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. माधव संपत सोनटक्के (रा. मोमीन चिकन सेंटर शेजारी, फुगे प्रायमर मॉलजवळ, भोसरी) असे नराधम आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माधव याने फ्लॅटचे पैसे घेऊन जाण्याकरिता त्याच्या घरी पीडित महिलेला बोलाविले होते. आरोपी हा भोसरी येथे राहायला आहे. त्यानंतर फिर्यादी यांच्या जेवणामध्ये त्याने गुंगीचे औषध मिसळले. फिर्यादी महिलेला गुंगी आल्यावर तिच्यावर शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच तसेच वेळोवेळी संधी साधून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, फिर्यादी महिला यांचे पती घरी नसताना आरोपीने पीडित महिलेला धमकी दिली. वारंवार पीडित महिलेवर अरोइकडून अत्याचार करण्यात आले आहेत. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.