पुणे : पुण्यातील आंबेगाव आणि वाकड परिसरात लग्नाचे अमिश दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीशी इन्स्ट्राग्रामवर ओळख निर्माण केली, तसेच पुढे तिच्याशी जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. तसेच लग्नास नकार देऊन मारहाण केली.
या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील तरुणावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2020 ते 10 जानेवारी 2024 या दरम्यान आंबेगाव आणि वाकड येथे हा प्रकार घडला आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आदित्य अर्जुन गिते (वय-25 रा. मु.पो. जामखेड, बैल बाजाराजवळ, ता. जामखेड जि. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित तरुणीची अर्जुन गिते याच्याशी सोशल मीडियावर मार्च 2020 मध्ये ओळख झाली होती. दोघांचे एकमेकांशी बोलणं सुरु झालं. त्यानंतर आरोपीने तु मला खूप आवडते माझे तुझ्यावर प्रेम आहे. असं बोलून तरुणीला भेटण्यास बोलावलं. त्यानंतर दोघांची प्रत्येक्षात भेट झाली. तिला लग्नाचे अमिष दाखवत आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर तरुणीने लग्नाचा विषय काढल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत विवाह करण्यास नकार दिला.
तसेच आरोपी आदित्य याने इंन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून मुलीला व्हिडिओ कॉल करुन अश्लील चाळे करत होता. याबाबत तरुणीने आरोपीला भेटून व्हिडिओ कॉलवर अश्लील चाळे का करतो अशी विचारणा केली असता तरुणीला त्याने हाताने मारहाण केली, असं फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.