पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहिले लग्न झाल्याचे असताना देखील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका युवकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हडपसर परिसरात असलेल्या पीडित मुलीच्या घरात घडला.
याप्रकरणी 30 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दिपक शंकर गायकवाड (वय-35 रा. हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीसोबत ओळख वाढवून तिच्याशी गोड बोलून जवळीक साधली. तसेच आरोपीचे लग्न झालेलं असताना देखील तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. मुलीच्या घरी येऊन आरोपी दिपकने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान, आरोपीचे लग्न झाल्याचे कळताच आपली फसवणूक झाल्याचे मुलीच्या लक्षात आले. तिने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी दिपक गायकवाड याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.