पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील मांजरी येथे माहेरी आलेल्या विवाहित तरुणीला आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. याबाबत 22 वर्षीय विवाहित महिलेने रविवारी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरुन वैभव विष्णू गायकवाड (रा. मांजरी बु., पुणे) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव गायकवाड आणि पीडित महिला एकाच परिसरात राहत आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये विवाहित महिला त्यांच्या आई-वडिलांच्या घरी माहेरी आली होती. त्यावेळी आरोपीने फिर्यादी महिला घरामध्ये एकटी असताना घरात आला. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने महिलेला धाक दाखवला.
तसेच आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच आरोपी गायकवाडने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.