ठाणे : ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३७ वर्षीय आरोपीनं १६ वर्षीय शाळकरी मुलीवर बलत्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच आरोपीने पीडित मुलीचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसात तक्रार केल्याने आरोपीने मित्राच्या घरी जाऊन आत्महत्या केली आहे. या संपुर्ण घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १६ वर्षाची असून मुरबाड तालुक्यातील एका गावात कुटूंबासह राहते. ती सध्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. १७ वर्षाच्या आरोपीने शेजारी राहणाऱ्या पीडित मुलीचे बाथरुममध्ये अंघोळ करत असतानाचे अश्लिल फोटो मोबाईलमध्ये चित्रित केले होते. त्यानंतर पीडित मुलीला भेटून तिला फोटो दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली. तुझ्या कुटुंबाला मारून टाकेल अशी धमकी देऊन आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. पीडित मुलीचे घराचे बाथरुम मागच्या बाजूला आहे.
१८ जानेवारी २०२४ पासन ते १५ फेब्रुवारी पर्यंत पीडितेवर बाथरुममध्येच बलात्कार केला. या त्रासाला कंटाळून मुलीने अखेर आईला सांगितले. आईने आणि पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत मुरबाड पोलिस ठाण्यात पीडित मुलीची तक्रार नोंदवण्यात आला. आरोपीवर बलात्कारासह विविध कलमानुसार आणि पोक्सो कायद्या अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपीने मित्राच्या घरी विश प्राशान करत आत्महत्या केली.