Ranjangaon News : रांजणगाव गणपती : राष्ट्रभाषा हिंदीचा सन्मान आणि गौरव करण्याचा दिवस म्हणजेच १४ सप्टेंबर. दरवर्षी हा दिवस राष्ट्रभाषा दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील महागणपती ग्रुप ऑफ स्कूलमध्ये १४ सप्टेंबर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी संग्रहित केलेले लेख, कविता, हिंदी साहित्यिकांची माहिती असलेल्या ‘अक्षरधारा’ या हस्तलिखिताचे अनावरण करण्यात आले.
राष्ट्रभाषा दिवस उत्साहात साजरा
राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या शिफारशीनंतर १९५३ पासून दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो, अशी माहिती हिंदी शिक्षिका स्मिता गोळे यांनी दिली. (Ranjangaon News) इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी श्रावणी कायते व हर्षिता पाठक यांनी हिंदी दिवसाचे महत्व सांगितले.
राष्ट्रभाषा हिंदीविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी तसेच हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. (Ranjangaon News) या वेळी महागणपती ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास शेळके, महागणपती ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अरविंद गोळे, पर्यवेक्षक निलेश पापळे, महागणपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपप्राचार्या अबेदा अत्तार , अक्षरनंदन गुरुकुल स्कूलच्या प्राचार्या वंदना खेडकर, श्री महागणपती ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या पद्मिनी कवठेकर, विभाग प्रमुख सोनाली नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूर तालुक्यातील म्हसे येथे महिलेवर बिबट्याचा हल्ला..