योगेश पडवळ
Ranjangaon News : पाबळ, (पुणे) : रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव परिसरात रोहित्र व रोहित्रामधिल कॉपर चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रांजणगाव पोलीसांची कामगिरी..
ईस्लाम शामद शेख (वय – ३०), वाल्मिक किसन कवडे (वय – ३०, रा. दोघेही चितेगाव ता. पैठण जि औरंगाबाद), मजहर अजिजुला खान (वय-३४, कोराडी सहजापुर वाळुंज एमआयडीसी असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे, रांजणगाव परिसरात रोहित्र व रोहित्रामधिल कॉपर चोरीचे सत्र सुरूच होते. (Ranjangaon News ) सदर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी पोलीस पथकाला दिल्या होत्या.
पोलीस तपास करीत असताना वरील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानी रोहित्र व रोहित्रामधिल कॉपर चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. (Ranjangaon News ) तसेच त्यांनी १५ गुन्हे केले असल्याची माहितीहि दिली आहे. पोलिसांनी ४५० कि.ग्रॅ. तांब्याच्या तारा, कॉईल व गुन्हयात वापरलेले पिकअप टेम्पो पोलीसांनी जप्त केला आहे.
सदरची कामगिरी रांजणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील शिवाजी मुंढे, दत्तात्रय शिंदे, विजय शिंदे, वैज्जनाथ नागरगोजें, संतोष औटी यांनी केली आहे.