Ranjangaon News : शिरूर, (पुणे) : खंडाळे (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत शेतात सुरू असणाऱ्या हातभट्टीवर रांजणगाव गणपती औद्यागिक वसाहत पोलिसांनी छापा टाकून ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका महिलेवर व जागा भाड्याने दिली म्हणून जागामालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी ही धडक कारवाई केली आहे.
एका महिलेवर व जागामालकावर गुन्हा दाखल
लक्ष्मी रमेश नट ( वय – ४०, रा. सणसवाडी, ता. शिरूर) व जागामालक दत्तात्रेय किसन दरवडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा (ता. शिरूर ) येथील चासकमान डाव्या कालव्या लगत कुरणमाळ शेतात गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (Ranjangaon News) मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, पोलिस हवालदार संतोष औटी, विलास आंबेकर व होमगार्ड शेख यांच्या पथकाने छापा टाकला.
सदर ठिकाणी एक महिला गावठी दारू तयार करत असल्याचे आढळून आले. (Ranjangaon News) यावेळी पोलिसांनी ३५ लिटर मापाची एकून १२ प्लास्टिक कॅण, दारू तयार करण्याचे रसायन, एक अल्युमिनीयमचा चाटू, नवसागरची पिशवी, एक दुचाकी असा एकूण ८० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता तिने तिचे नाव वरीलप्रमाणे सांगितले तसेच हि जागा भाड्याने घेतली असल्याने पोलिसांनी जागामालक दरवडे याच्यावरहि गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, रांजणगाव गणपती येथे महागणपती मुक्तव्दार दर्शन सुरू झाले आहे. त्यामुळे राज्यातून भावीक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात. (Ranjangaon News) या भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू धंदे सुरू असल्याने महागणपती गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर या भागात सुरू असणाऱ्या अवैध दारूविक्रीवर कारवाई होणार का? असा सवाल भाविक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ranjangaon News : रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात चोरी करणाऱ्या तिघांना बेड्या, १५ गुन्हे उघडकीस