राहुलकुमार अवचट
यवत : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव येथे विमल गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत १६ हजार ४०१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस नाईक अजित इंगावले यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सागर मोहन कदम (रा. पिंपळगाव, ता. दौंड, जि. पुणे) याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव येथे जय महाकाल या नावाने आरोपी सागर कदम यांचे किराणा दुकान आहे. या दुकानात कदम हे महाराष्ट्रात बंदी असलेल्या विमल पान मसाल्याच्या १४ हजार ६४१ रुपये किंमतीच्या ७६ पुड्या आणि १ हजार ७६० रुपये किंमतीच्या तंबाखुच्या पुड्या असा एकुण १६ हजार ४०१ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत
यवत पोलिस स्टेशन हद्दीतील यवत, वरवंड, पाटस, केडगाव चौफुला, राहु परिसरात मोठ्या प्रमाणात बंदी असताना देखील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे विक्री होत असून यवत पोलीस यावर कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.