प्रतिनिधी: युनूस तांबोळी
शिरूर: शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या महिण्यात रोजा ( उपवास ) तराविह ची नमाज तसेच दान देऊन अल्लाहा ची उपासना करण्याकडे मु्स्लिम बांधवाचा अधिक कल होता. या भागातील प्रत्येक गावात ईदगाह मैदानावर रमजान ईद ची नमाज पठण शांततेत पार पडली. कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील ईदगाह मैदानावर सकाळी आठ वाजता मौलाना अब्दुल रज्जाक यांनी आल्लाह च्या इबादत बाबत मु्स्लिम बांधवांना मार्गदर्शन केले. नमाज नंतर खुदबा पठण करून भाईचारा व शांततेसाठी दुवा करण्यात आली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी गळाभेट करून एकमेकांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शिरखुर्रमा वाटपाचा कार्यक्रम झाला.
हिंदू बांधवांनी यावेळी भेट देऊन रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. कान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथील ईदगाह मैदानात ईद उल फित्र ची नमाज उत्साहात व शांततेत पार पडली. या कार्यक्रमासाठी शिक्रापूर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. कान्हूर मेसाई चे निवृत्त पोलीस अधिकारी विठ्ठल खर्डे, पोलीस जमादार गणेश सुतार, पाटील साहेब होमगार्ड गिरीश खैरे, जाधव हजर होते. यावेळी मौलाना अफसर यांनी ‘कुराण’ व ‘हदिज’ चे मार्गदर्शन केले. मनाला शांती तसेच जीवनात प्रगतीचा मार्ग मिळवायचा असेल तर ‘कुराण ए हदीज’ मध्ये सांगितल्या प्रमाणे जीवनाचा मार्ग आचरण करावा असे सांगितले. तसेच व्यसना पासून दुरु राहण्यास सांगीतले. दिवसातील पाच वेळा नमाज पठण केल्यामुळे मन शांत व शरीर सुदृढ राहते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नमाज नंतर सामूहिक दुवा पठण करण्यात आली. सर्व विश्वात शांती नांदावी. पाऊस वेळेवर व्हावा, सर्वांनी ऐकजुटीनी राहावे अशी प्रार्थना अल्लाह कडे केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचा नुरांनी मुस्लिम जमात च्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच आसिया तांबोळी, माजी उपसरपंच युनूस तांबोळी, माजी उपसरपंच अबीदभाई तांबोळी, ओबीसी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष अल्ताफ तांबोळी, ग्रंथपाल हमीद तांबोळी, सुलतान शेख, अस्लम तांबोळी, इरफान मुलाणी, मोहम्मद तांबोळी, हुसेन तांबोळी, जाकीर तांबोली, फैय्याज तांबोळी, बशीर मुलाणी, सरदार शेख उपस्थीत होते. पिंपरखेड, टाकळी हाजी, मलठण, सविंदणे, रावडेवाडी या ठिकाणीही रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.