यवत / राहुलकुमार अवचट : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती सर्वत्र साजरी केली जात असताना कासुर्डी येथे स्मशानभूमीची स्वच्छता करत अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.
स्वराज्य उभे करण्याचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब यांच्याकडून मिळाले होते. त्याचप्रमाणे हिंदू धर्माचा प्रचार प्रसार संपूर्ण जगामध्ये करण्याचे काम ज्यांनी केलं ते स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिवस. या दोन महापुरुषांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ ग्रामपंचायत कासुर्डी व वि. वि. सोसायटी कासुर्डी यांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली.
कासुर्डीतील स्मशानभूमीची श्रमदानाने स्वच्छता साफसफाई सकाळी ७ ते ९ या वेळेत करण्यात आली केली. स्मशानभूमी परिसरामध्ये साचलेल्या कचरा, अर्धवट जळाऊ अवस्थेत असलेली लाकडे, त्याचप्रमाणे पालापाचोळा हा झाडून घेऊन एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
श्रमदानासाठी कासुर्डी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग बाजीराव आखाडे, अविनाश आखाडे, तानाजी गायकवाड, मराठा महासंघ जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर, वासुदेव आखाडे, बाळासाहेब टेकवडे, उपसरपंच अशोक सोनवणे, संतोष पोपट आखाडे, राजाभाऊ आखाडे, संतोष सर्जेराव आखाडे, अमोल चौँडकर, लक्ष्मण खेनट, युवराज ठोंबरे, बाळासाहेब राजाराम आखाडे, पिंटू आरडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.