Rajgurunagar News : राजगुरुनगर : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक अरुण सिताराम चांभारे यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ अ (१) (ब) अन्वये संचालक पदावरून कमी करीत असल्याचा निकाल सहकारी संस्था (दुग्ध) चे विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी दिला आहे.
पदाचा गैरवापर करून पुतण्याला उपपदार्थ विक्रीची एजन्सी दिल्याची तक्रार
याबाबत चांभारे यांनी पदाचा गैरवापर करून सख्या भावाच्या मुलाला उपपदार्थ विक्रीची एजन्सी दिल्याची राजेंद्र लक्ष्मण म्हसे रा मांजरेवाडी ता. खेड यांनी विभागीय उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली होती. विभागीय उपनिबंधक डॉ.महेश कदम यांनी निकालात नोंदवलेल्या निष्कर्षानुसार दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांचे पुतणे संदीप ज्ञानदेव चांभारे यांच्या राधाकृष्ण मिल्क एजन्सीकडून संघास येणे थकबाकी आहे. (Rajgurunagar News ) व तत्कालीन संचालक अरुण चांभारे यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने या थकबाकी रक्कम वसुलीबाबत सहकार न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये अरुण चांभारे यांना पार्टी करून घेण्याचा निर्णय संचालक मंडळ सभा दि.२९ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आला. त्यावेळी अरुण चांभारे हे संचालक मंडळ सदस्य नव्हते. परंतु सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये अरुण चांभारे हे संचालक म्हणून निवडून आले आहेत.
सहकार न्यायालयात दाखल वसुली दाव्यामध्ये पार्टी करण्याबद्दलच्या ठरावातून त्यांचे नाव वगळण्यात यावे, असा निर्णय संचालक मंडळ सभा दि. २५ आगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आला होता. यावरून प्रस्तुत राधाकृष्ण मिल्क एजन्सी व त्याच्या थकबाकीसंबंधाने संघाच्या स्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीमध्ये अरुण चांभारे यांचा हस्तक्षेप दिसून येतो. मात्र, अरुण चांभारे यानी संघाचे संचालक या नात्याने व कायदेशीर जबाबदारी म्हणून संघाच्या आर्थिक हितासाठी त्यांचा पुतण्या प्रोप्रायटर असलेल्या एजन्सीकडून संघास येणे असलेली लाखो रुपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी प्रयत्न केल्याचे दिसून आलेले नाही. अरुण चांभारे यांचेकडूनही प्रस्तुत प्रोसिडिंगमध्ये तशी लेखी माहिती सादर करण्यात आलेली नाही. (Rajgurunagar News ) याउलट त्यांच्या कुटुंबातील सदस्य प्रोप्रायटर असलेल्या राधाकृष्ण मिल्क एजन्सीकडून संघाची थकबाकी वसूल न होता संघास न्यायालयीन दाव्यांपोटी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यावरून अरुण चांभारे हे संघाच्या व तिच्या सदस्यांच्या हितास बाधक होईल अशी कृती करीत असून त्यांनी संचालक या नात्याने त्यांच्या कर्तव्यात कसूर केली आहे असे सिद्ध होते..
संघीय संस्था या नात्याने महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या, मुंबई यांचेकडून अरुण सिताराम चांभारे यांना कारणे दाखवा नोटीसबाबत अभिप्राय सादर करणेबाबत कळविण्यात आले होते. त्यावर चांभारे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ कायद्याअंतर्गत नियमानुसार उचित कार्यवाही करावी. (Rajgurunagar News ) त्यानंतर अरुण चांभारे यांचेकडून वरील नोटीसला दि.०२ जानेवारी २०२३ रोजी लेखी म्हणण्याची प्रत सोबत जोडून पुनश्च पत्राने महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई यांना संघीय संस्था या नात्याने अभिप्राय सादर करणेबाबत कळविण्यात आले होते.
तथापि, त्यांच्याकडून नव्याने कोणतेही अभिप्राय प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे संघीय संस्थेशी वाजवी विचारविनिमय करण्यात आला. त्यांच्या पत्रानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याखालील नियम १९६१ मधील नियमानुसार उचित कार्यवाही करावी, असे त्यांच अभिप्राय असल्याची नोंद घेण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Rajgurunagar News : अंगावर वीज कोसळून चास येथील ७० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू..!