अरुण भोई
दौंड : राजेगाव (ता.दौंड) येथे झालेल्या यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात (केंद्रस्तरीय) राजेगाव केंद्र शाळेने तब्बल १८ प्रथम क्रमांकाचे बक्षिसे पटकावून घवघवीत यश संपादन केले.
राजेश्वर विद्यालयात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच प्रविण लोंढे, मुकेश गुणवरे, शिवाजी मोरे, केंद्रप्रमुख महादेव कोपनर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश मोरे, राजेश राऊत, सोपान चोपडे, ग्रामपंचायत सदस्य संदिप भोसले, अमोल इंदलकर, मुख्याध्यापक आप्पासाहेब मेंगावडे, केंद्र समन्वयक अमजद पठाण आदी उपस्थित होते. स्पर्धेत राजेगाव केंद्रातील १२ शाळांचे खेळाडू सहभागी झाले होते. राजेगाव शाळेने एकूण १८ बक्षिसे मिळवली.
मोठ्या गटात कबड्डी मुले, मुली, खो-खो मुली, लोकनृत्य आणि लहान गटात कबड्डी मुली, खो-खो मुले, मुली या सांघिक खेळात प्रथम क्रमांक पटकावले. वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत मोठ्या गटात
१. वक्तृत्व स्पर्धा मुली – मानवी प्रदिप गायकवाड, २) १०० मी. धावणे मुली – रेखा लक्ष्मणभाई भरवाड, ३) थाळीफेक मुले – आयान सिराज शेख, ४) थाळीफेक मुली – राजेश्वरी सुरेश मोघे, ५) लांब उडी मुले – अमीर युनुस शेख, ६) लांब उडी मुली – सुमय्या सिराज शेख, ७) उंच उडी मुली – रेखा लक्ष्मणभाई भरवाड, ८) गोळा फेक मुले – यश नितीन मोरे, ९) प्रश्नमंजुषा मोठा गट – प्रथम क्रमांक – श्रावणी विकास मोरे आणि गौरव गणेश बांदल
लहान गटात दोन बक्षिसे…
१) ५० मीटर धावणे मुले – अथर्व बाळासाहेब बंडगर, २) लांब उडी मुली- अक्सा तायर पठाण एज
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आप्पासाहेब मेंगावडे, प्रशांत वाघमोडे, दिलीप शिर्के, तुकाराम उगलमोगले, संजय नेमाने, वैशाली कुदळे, योगिता कचरे यांचे मार्गदर्शन मिळाले.