अरुण भोई
Rajegaon News : राजेगाव : परिसरातील कोशिंघर येथे आज (ता. २७) पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास भालचंद्र सोमाजी कडू यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी घराची दोन कुलूप तोडली. तिसरे कुलूप तोडत असतानाच शेजारच्या घरातील नागरिक लघुशंकेसाठी उठले. यामुळे चोरटे सावध झाले आणि तेथून धूम ठोकली.
परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चोरपावलांनी चोरटे घरात शिरले. त्यांनी दोन दरवाजांची कुलूप तोडली. तिसऱ्या दरवाजाचे कुलूप तोडण्याच्या तयारीत असतानाच शेजारी लघुशंकेसाठी उठले. (Rajegaon News) कोणीतरी उठल्याची चाहूल लागताच चोरट्यांना संशय आला. सावधगिरी बाळगून कामगिरी फत्ते न करताच चोरट्यांनी धूम ठोकली.
या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांनी व वस्त्यांनी रात्रीच्यावेळी जागरूक राहावे, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन गावचे सरपंच प्रवीण लोंढे व पोलीस पाटील महेश लोंढे यांनी केले आहे. (Rajegaon News) दरम्यान, यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळेच परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Rajegaon News : संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त राजेगावात नाभिक पुराण पारायण
Rajegaon News : राजेगावमधील तलाठी कार्यालय बंद; शेतकऱ्यांची गैरसोय
Rajegaon News : बारामती कॅटल फिड्सतर्फे राजेगावात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप