अरुण भोई
Rajegaon News : राजेगाव : राजेगाव व खानोटा या गावांसाठी राजेगाव येथे तलाठी कार्यालय आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील ही दोन्ही मोठी गावे आहेत. याठिकाणी महसूल विभागाची खूप कामे असतात. याच ठिकाणी स्थानिक सहकारी संस्था देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. शेतकरी बांधवांना इकरार, सात बरे, फेरफार, उत्पन्न अहवाल, वारस नोंद अशी विविध कामे नियमित या कार्यालयात सुरु असतात. मात्र, येथे नव्याने नियुक्त झालेले तलाठी अद्याप एकदाही येथे फिरकलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
तलाठी मंडळी वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता मनमानी कारभार करत असल्याने ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे. गेली सात दिवसांपासून तलाठी कार्यालयात आलेले नसल्याने, ग्रामस्थांची होणारी (Rajegaon News) गैरसोय टाळण्यासाठी राजेगाव व खानोटासाठी पूर्णवेळ काम करणारा तलाठी मिळण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
महसूल विभागाचा आळशीपणा…
या भागातील मंडल अधिकारी एकदाही या भागात फिरकलेले नाहीत. ते एकाच ठिकाणी बसून आपल्या मंडलाची कामे करत आहेत. त्यांनी ठराविक वार नेमून त्या-त्या गावांमध्ये कामे केल्यास शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि त्यांची कामे देखील वेळेवर पूर्ण होतील.
महसूल विभागाचा हलगर्जीपणा….
एका तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा पदभार असतो. (Rajegaon News) त्यांना मोठ्या गावांमध्ये काम करणे शक्य होत नाही. मोठ्या गावांसाठी स्वतंत्र तलाठी नेमण्याची मागणी देखील यानिमित्ताने होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार; राज्य मंडळाची घोषणा