अरुण भोई
Rajegaon News : राजेगाव : संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त राजेगाव येथे नाभिक पुराण पारायण झाले. समाजबांधवांनी भजन, किर्तनाचा लाभ घेतल्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संत सेना महाराज यांचा जन्म १३५७ या दिवशी मध्यप्रदेशमधील बांधवगडमध्ये झाला. बांधवगड हे एक वैभवशाली शहर होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवीदासपंत तर आईचे नाव प्रेमकुंवरबाई होते. (Rajegaon News) सेना महाराजांचा जन्म हा देवाच्या कृपेने झाला, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सेना महाराजांवर बालपणापासून धार्मिक संस्कार झाले होते.
महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता
संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करून, त्यांचे पुण्यस्मरण केले जाते. राजेगाव येथे आयोजित कार्यक्रमात सकाळच्या सत्रात नाभिक पुराण पारायण झाले. (Rajegaon News) सकाळी ९ ते १२ या वेळात भजन जाले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे आयोजन वाघमारे परिवार अनेक वर्षांपासून करत आहे. या कार्यक्रमासाठी राजेश्वर भजनी मंडळ तसेच वाघमारे, राऊत, थोरात, जाधव, महाले परिवाराची प्रमुख उपस्थिती होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Rajegaon News : राजेगावमधील तलाठी कार्यालय बंद; शेतकऱ्यांची गैरसोय
Rajegaon News : बारामती कॅटल फिड्सतर्फे राजेगावात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप