अरुण भोई
Rajegaon News : राजेगाव : बारामती कॅटल फिड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने सीएसआर योजनेअंतर्गत राजेगाव जिल्हा परिषद शाळा आणि राजेगाव भाग शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
सीएसआर फ़ंडातून केले वह्या वाटप
या कार्यक्रमासाठी हिंदुस्तान कॅटल फिड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी तुकाराम गायकवाड, तांत्रिक व्यवस्थापक दर्शन गावडे, राजेगाव येथील दूध डेअरीचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य भारत खराडे, सोपान चोपडे यांचे सहकार्य लाभले. (Rajegaon News) कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आप्पासाहेब मेंगावडे यांनी केले. तुकाराम गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी बोलताना तुकाराम गायकवाड म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांसाठी आम्हाला जे जे शक्य आहे, ते आम्ही नक्कीच करू. (Rajegaon News) राजेगावचे सरपंच प्रवीण लोंढे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य सोपान चोपडे, शिक्षण समिती अध्यक्ष संतोष थोरात, किरण जाधव, अमोल इंदलकर तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : मुली कोण देईना अन् शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न काय होईना !
Daund News : गुळाचा टेम्पो उलटला; ढेपेखाली गुदमरून चालकाचा मृत्यू