पुणे : दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कूलच्या राज धायगुडे अन् संचित होले या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेतही निवड झाली आहे.
बुधवार (दि.13) रोजी गणेश हॉल, ज्युनियर लायब्ररी, क्रांती मैदान, दौंड या ठिकाणी क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे तालुकास्तरीय शालेय योगा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान योगा दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावी कॉमर्स चा विद्यार्थी संचित धर्मराज होले 17 वर्षाखालील रिद्धीमिक योगा या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर इयत्ता अकरावी सायन्स चा विद्यार्थी राज विशाल धायगुडे 19 वर्षाखालील योगा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड 19 सप्टेंबर 2024 रोजी जुन्नर या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे.
या विजेते विद्यार्थ्यांना दत्तकला शिक्षण संस्थेचे क्रीडा शिक्षक प्रदीप सुनिल शिवपुजे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी, सचिव माया झोळ, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर (स्कूल ऑफ डायरेक्टर), प्राचार्य नंदा ताटे, (एस.एस.सी.) व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य सिंधू यादव, विभाग प्रमुख प्रा. खाडे, प्रा. धर्मेंद्र धेंडे व सर्व शिक्षक वृंदावन यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.