पुणे : जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी प्रवीण शेळके, प्रसाद धेंड आणि आर्या महाडिक यांचा समावेश असलेल्या ‘युरेका एन्वॉयज’ या विद्यार्थ्यांच्या संघाने आयआयएम-अहमदाबाद येथे आयोजित अमेथॉन ज्ञान इनोव्हेशन चॅलेंजमध्ये “कृषी आधार” स्टार्टअपने उपविजेतेपद १५ हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले.
विद्यार्थी संघ ‘युरेका एन्वॉयज’, नाविन्यपूर्ण स्टार्टअप, “कृषी आधार,” या प्रतिष्ठित स्पर्धेत लक्ष वेधून घेतले. ही स्पर्धा अमेथॉन ज्ञान इनोव्हेशन चॅलेंजचा एक भाग होती. यामध्ये देशभरातील बहुसंख्य इच्छुक उद्योजक आणि स्टार्टअप्सचा सहभाग होता. प्रा. स्वप्नील महाजन यांनी स्टार्टअपसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हनी बी नेटवर्कचे संस्थापक पद्मश्री अनिल कुमार गुप्ता यांच्याकडून रायसोनीच्या विद्यार्थी संघाला अतिरिक्त समर्थन करत इनक्युबेशन स्पार्टअप हे कृषी क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले.
रायसोनी पुणे कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले की, जीएच रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण आणि उद्योजकीय कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील असते. अमेथॉन ज्ञान इनोव्हेशन चॅलेंजमधील ‘युरेका एन्वॉयज’चे यश नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्टतेची पावती आहे.
रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी “कृषी आधार” या नाविन्यपूर्ण स्टार्टअपमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन केले.