पुणे : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंटच्या एमबीए प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी आशुतोष खाडे याची हिमाचल प्रदेशातील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाईड स्पोर्ट्सच्या (ABVIMAS) हातकोटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय स्वयंसेवा (एनएसएस) साहसी शिबिर २०२३-२४ साठी निवड झाली आहे. आशुतोष खाडे याची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत करण्यात आली आहे.
विद्यार्थी आशुतोष खाडे यांची ‘एनएनएस’च्या राष्ट्रीय स्तरावरील साहसी शिबिरासाठीची निवड ही त्याचे कौशल्य, नेतृत्वगुण आणि वैयक्तिक आणि सामाजिक विकासासाठी वचनबद्ध असल्याची साक्ष देते. राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेले ‘एनएनएस’चे साहसी शिबिर विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक वातावरणात त्यांची नेतृत्व क्षमता, टीमवर्क आणि लवचिकता दाखवण्याची संधी असते.
जीएचआरसीईएम, पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर, म्हणाले की, आशुतोष खाडे यासारखे समर्पित आणि कर्तृत्ववान विद्यार्थी आमच्या एमबीए विद्याशाखेत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. त्याच्या या यशाने केवळ स्वत:लाच नाही तर एमबीए विभाग आणि संपूर्ण ‘जीएचआरसीईएम’चाही सन्मान केला आहे.
रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी, रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी, एमबीए विभाग प्रमुख डॉ. शिवानंद सनमथ आणि एमबीए विभाग यांनी आशुतोष खाडे यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.