अरुण भोई
राजेगाव : बेंगलोर, नवी दिल्ली, कर्नाटका एक्सप्रेस (गाडी क्र. १२६२७) यासह इतर रेल्वेगाड्या दौंड स्थानकावर थांबतात. या सर्व गाड्या भिगवण स्थानकापर्यंत आल्यास शालेय विद्यार्थी, कामगार वर्ग, नोकरदार, व्यापाऱ्यांना याचा लाभ होईल, अशी मागणी करत आज रेल्वे भिगवन स्टेशन येथे थांबवून ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्यात आले.
या वेळी दौंड, इंदापूर, कर्जत तालुक्यांतील ग्रामस्थ, भिगवण रेल्वे प्रवासी संघ, भिगवण ग्रामपंचायत, पंचशील सेवाभावी संस्था, रिक्षा संघटना भिगवण, भिगवण परिसरातील व्यापारी वर्ग, डिकसळ, तक्रारवाडी, मदनवाडी, खानोटा, राजेगाव, वाटलूज, नायगाव, बिल्ट कंपनी कामगार, माथाडी कामगार भिगवण, स्टेशन, रोटरी क्लब भिगवण, भादलवाडी, डाळज नं १, २, ३, पळसदेव, पिंपळे, शेटफळ गढे, लामजेवाडी, स्वामी चिंचोली, खडकी, कोंढार चिंचोली, खेड, भिगवण परिसरातील सर्व ग्रामस्थांनी रेल्वे रोको आंदोलनात सहभाग घेतला.
दौंड ते पुणे (डेमो), पुणे ते दौंड (डेमो) यासह सर्व गाड्या दौंडपर्यंत येतात. याच रेल्वेगाड्या जर भिगवण स्टेशनपर्यंत आल्या, तर या ठिकाणचे शालेय विद्यार्थी, कामगार, नोकरदार, व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल, असे या वेळी सरपंच प्रविण लोंढे यांनी सांगितले. या वेळी दौंड, इंदापूर, कर्जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच,सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.