(Railway News) पुणे : पुणे रेल्वे विभागातून धावणाऱ्या ५० गाड्यांना १५ रेल्वे स्टेशनवर नव्याने थांबे देण्यात येणार असून पुणे विभागातील शहराजवळील महत्त्वाचे स्टेशन येथे यापुढे मेल एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे.
१५ स्टेशनवर ५० एक्स्प्रेस गाड्यांना काही वेळ थांबा
पुणे विभागातील तळेगाव, हडपसर, साताराबरोबरच महत्त्वाच्या १५ स्टेशनवर ५० एक्स्प्रेस गाड्यांना काही वेळ थांबा दिला जाणार आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार असून, रेल्वेची प्रवासी संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
मध्य रेल्वेमधील पुणे रेल्वे हा एक महत्त्वाचा विभाग आहे. पुणे रेल्वे विभागात दिवसाला अडीचशेपेक्षा जास्त गाड्या धावतात. त्यामध्ये एक्स्प्रेस, लोकल गाड्यांचा समावेश आहे. पुणे विभागातून धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेसला खूपच कमी थांबे आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या थांब्यांवर मेल, एक्स्प्रेस थांबतात. त्यामुळे प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी याच स्टेशनवर जावे लागते.
दरम्यान, पुणे-मिरज दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे क्रॉसिंगसाठी गाड्यांना लागणारा ४० ते ४५ मिनिटांचा वेळ कमी झाला आहे. त्यामुळे या वेळेचा वापर प्रवाशांच्या सोयीसाठी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Hadapsar News : कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर महाविद्यालयात “जागतिक महिला दिन; उत्साहात साजरा.
Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला!