Railway News | पुणे : पुणे-मुंबई या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा आणि सुरळीत होण्यासाठी रेल्वे विभागाकडून उपाय योजना केल्या जात आहेत. मध्य रेल्वेकडून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना जागा अपुरी…
पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर दररोज हजारोंच्या संख्येने चाकरमानी ये-जा करतात. सध्या या मार्गावर प्रवाशांना जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्रवास करताना हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मुंबई येथील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आगामी काळात काम संपल्यावर गाड्यांचे डबे वाढविण्याची शक्यता आहे.
जागा मिळत नसल्यामुळे हाणामारीच्या घटना…
आरक्षण करून देखील रेल्वेत बसायला जागा मिळत नसल्यामुळे हाणामारीच्या घटना घडत आहेत. असे प्रकार पुणे-मुंबईदरम्यान
धावणार्या गाड्यांमध्ये होतात. सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन या गाड्यांमध्ये अशा घटना अनेकदा घडतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्राधान्याने या गाड्यांचे डबे वाढविण्याची गरज आहे. पुणे आणि परिसरातील रेल्वे संघटनांकडून सातत्याने अशी मागणी करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 10/11 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, सध्यातरी पुणे-मुंबई मार्गावरील गाड्यांचे डबे वाढविण्याबाबतचा प्रस्ताव नाही. परंतु, आगामी काळात काम झाल्यावर काय असेल, याबाबत सांगता येत नाही.
सुमंत देऊळकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी (अति. कार्य), मध्य रेल्वे, मुंबईप्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम हाती घेऊन आत्ता रेल्वेला शहाणपण सुचले आहे. 24 कोचच्या गाड्यांची या मार्गावर गरज आहे आणि प्रवाशांकरिता रेल्वेने हे करायलाच हवे.
– हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप
मुंबईमध्ये प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम सुरू आहे. मात्र, सध्या डबे वाढविण्याचे नियोजन नाही. काम पूर्ण झाल्यावर वरिष्ठपातळीवर काय निर्णय होईल, हे सांगता येत नाही.
– अजय कुमार, जनसंपर्क अधिकारी (अति. कार्य), रेल्वे, पुणे विभाग
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Hadapsar Railway Station | हडपसर टर्मिनलसाठी तब्बल १३६ कोटी ; रेल्वे प्रवास होणार सुसाट
Railway Tours | पुणे-इंदूर दरम्यान १४ साप्ताहिक रेल्वेच्या फेर्या