Railway | पुणे : लातूर रेल्वे गाडीला असलेला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुणे रेल्वे विभागाकडून पुणे-लातूर-पुणे अशी नवीन गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयास पाठविण्यात आला आहे. पुणे-लातूर रेल्वे सेवा सुरू झाल्यास सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
लातूर मार्गे जाणाऱ्या गाड्यांना नेहमीच गर्दी असल्यामुळे नागरिकांकडून लातूर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. पण, रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे कोच उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा सुरू केली जात नव्हती. पण आता रेल्वेचे कोच उपलब्ध झाल्यामुळे आणि नागरिकांच्या मागणीचा विचार करता पुणे विभागाने लातूरसाठी रेल्वे सोडण्याचा निर्णय केला आहे.
पुण्यातून लातूरला जाण्यासाठी बिदर एक्स्प्रेस, नांदेड एक्स्प्रेस आणि हैदराबाद एक्स्प्रेस…
पुण्यातून लातूरला जाण्यासाठी बिदर एक्स्प्रेस, नांदेड एक्स्प्रेस आणि हैदराबाद एक्स्प्रेस अशा गाड्या आहेत. यातील दोन गाड्या रात्री आहेत. तर, हैदराबाद एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस हडपसर टर्मिनलवरून सकाळी सुटते. या गाड्यांना खूपच गर्दी असते. त्यामुळे लातूरला जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
दरम्यान, मुख्यालयाकडून या प्रस्तवाला मंजूरी मिळाल्यास पुणे स्थानकातून दररोज सकाळी सात वाजता लातूरसाठी रेल्वे रवाना होणार आहे. दुपारी एक वाजता ती लातूर येथे दाखल होईल. त्यानंतर लातूरवरून दुपारी दोन वाजता पुण्यासाठी रवाना होणार आहे. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यास दररोज पुण्याला येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Railway News : हडपसर टर्मिनलचे होणार लवकरच विस्तारीकरण ; पुणे रेल्वे स्टेशनवरील भार होणार कमी..!
Railway News | रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी;या गाड्या होणार पुन्हा रद्द