Rahul Kul | दौंड, (पुणे) : अवकाळी पावसामुळे शेतऱ्यांच्या हात तोंडाशी आलेले पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तसेच व्यावसायिकांचेही नुकसान झाल्याने त्यांना भरपाई मिळण्यासाठी तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे आमदार अॅड. राहुल कुल (Rahul Kul) यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यासह इतर भागात विजांच्या गडगडाटासह मोठा अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेले गहू, कांदा, आंबा, द्राक्ष व डाळिंब यासारख्या पिकांचे व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीटभट्टी व्यावसायिक, कोळसा व्यावसायिक व इतर अनेक व्यावसायिकांचे देखील मोठे नुकसान झालेले आहे.
या सर्वांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी त्यांचे पंचनामे करणे आवश्यक आहे. नुकसानीची संबंधितांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात. अशी मागणीही केली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.