वाघोली : अष्टापूर(ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पुष्पा कोतवाल यांची बिनविरोध निवड पार पडली. या निवडीने अष्टापूर गावाने सरपंच व उपसरपंच पदांच्या बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखली आहे.
माजी सरपंच अश्विनी नवनाथ कोतवाल यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त असलेल्या जागेसाठी निवडणूक अष्टापूर ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मंडलाधिकारी नुरजहा सय्यद, ग्रामविकास अधिकारी महाले यांच्या अधिपत्खाली पार पडली. यामध्ये सरपंच पदासाठी पुष्पा सुरेश कोतवाल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी उपसरपंच गणेश कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, कालिदास कोतवाल, संजय कोतवाल, सुभाष कोतवाल, कविता जगताप, अश्विनी कोतवाल, कविता कोतवाल, रेश्मा ढवळे, अलका कोतवाल उपस्थित होते.
सरपंच पदी निवड झाल्याबद्दल पुष्पा सुरेश कोतवाल यांची फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोल, ताशांच्या गजरात, वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, यशवंत सहकारी कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी सरपंच अश्विनी कोतवाल, उपसरपंच गणेश कोतवाल, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सरपंच रामदास कोतवाल, माजी सरपंच नितीन मेमाणे, यशवंत कारखान्याचे माजी संचालक सुखदेव कोतवाल, यशवंत कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, अष्टापूर सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुरेश कोतवाल, भैरवनाथ दिंडीचे अध्यक्ष आबासाहेब कोतवाल, पोलीस पाटील कैलास कोतवाल, शिवाजी कोतवाल, माजी सरपंच दादासाहेब कोतवाल, दत्तोबा कटके, तयाजी जगताप, उद्योजक पोपट कोतवाल, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अष्टापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अष्टापूर मध्ये जलजीवन पाण्याच्या योजनेचे काम उत्तम दर्जाचे करून गावात रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्था, शैक्षणिक सुविधा, आदी विकासाची कामे करून शासनाच्या योजना, सेवा, सुविधांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहून सर्वांना सोबत घेऊन गावचा सर्वांगीण विकास करणार आहोत.