भिगवण : उन्हाळ्याची चाहूल लागताच हापूस आंबाप्रेमींची पावले आपसूकच हापूस आंब्याकडे वळतात. पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये हापूस आंबा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच दाखल होतो. परंतु ग्रामीण भागामध्ये फळांचा राजा आंबा दाखल होण्यास मार्च, एप्रिल महिना उजाडतो. यंदा मात्र एक महिना अगोदरच हापूस आंबा ग्रामीण भागामध्ये दाखल झाला आहे. विशेष म्हणजे त्याचा दरही आटोक्यात आहे. यंदा हापूस आंब्याची पहिली पेटी ११ हजार रुपयांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पराग रमेशराव जाधव यांनी तर दुसरी पेटी रामदास झोळ यांनी खरेदी केली तर तिसरी पेटी प्रसिद्ध सराफ व्यावसायिक व पत्रकार सुरेश पिसाळ यांनी खरेदी केली आहे.
या वेळी ज्योती समूहाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर पवार, मराठा महासंघ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग जगताप, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तुषार क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय धवडे, माजी रोटरी अध्यक्ष रियाज शेख, ग्रामपंचयत सदस्य जावेद शेख, रोटरीचे अध्यक्ष रणजीत भोंगळे, संस्थापक अध्यक्ष रोटरी सचिन बोगावत, सरपंच तुकाराम बंडगर, प्रमोद नरूटे, संजय खाडे, पत्रकार आप्पासाहेब गायकवाड, पत्रकार आकाश पवार, छगन वाळके, अक्षय एकाड व इतर सदस्य या वेळी उपस्थित होते.